बदललेलं राजकारण ओळखायला मी अयशस्वी ठरलो - सुजय विखे पाटील - Sujay Vikhe Patil
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर/ राहाता Sujay Vikhe Patil News : चांगलं काम करणाऱ्या सरपंचाच्या पराभवानं सरपंच संपत नाही तर गाव संपतं. वेळ निघून गेल्यावर त्या गोष्टींची जाणीव व्हायला लागल्यावर चर्चा करायला काही अडचण नाही. जेवढं तुम्ही विकासासाठी पळणार तेवढंच लोक तुम्हाला पाडण्यासाठी एकत्र येणार. असे अनेकांना मी सल्ले देत गेलो. मात्र, याची अंमलबजावणी मी स्वतःवर केली नाही, याचं मला दुःख असल्याचं वक्तव्य माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलय. राहाता तालुक्यातील एका खासगी पतसंस्थेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या भाषणादरम्यान सुजय विखे पाटील म्हणाले की, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की समाजाला एखादी गोष्ट मान्य असेल तर त्याचा विरोध आपण का करावा? बदललेलं राजकारण ओळखायला मी अयशस्वी ठरलो. मात्र, मी खूप काही शिकलोय. पण आता मी ठरवलय की एखादं उद्घाटन असेल, वाढदिवस असेल किंवा जागरण-गोंधळ, हजर राहायचे. दहावा असेल तर लगेच सांगा, कावळ्याच्या आगोदर सुजय विखे हजर राहील, असंही ते म्हणाले.