"तालुक्याचा बाप कोण? जनताच दाखवून देईल"; सुजय विखेंचं जयश्री थोरातांना प्रत्युत्तर - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 22, 2024, 4:51 PM IST
अहिल्यानगर : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलंय. निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक असल्यानं अनेक नेत्यांनी आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसलीय. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या संगमनेर मतदारसंघात जाऊन मंत्री बाळासाहेब थोरातांना लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात यांनीही 'युवा संवाद यात्रे'च्या माध्यमातून विखेंच्या मतदारसंघातील जोर्वे गावात येत 'माझ्या बापावर टिका कराल, तर खबरदार', तसंच बाळासाहेब थोरात यांचा परिवार हा पाच, दहा लोकांचा नसून सात लाख लोकांचा आहे, असं म्हटलं होतं. जयश्री थोरात यांच्या या धमकीला सुजय विखेंनीही थोरातांच्या मतदारसंघातील साकुर गावात येत प्रत्यूत्तर दिलंय. "बापाबद्दल नव्हे, निष्क्रीय आमदाराबद्दल बोललो! अहो ताई, लोकाशाही प्रक्रीयेत मायबाप जनता बाप असतो. तालुक्याचा बाप कोण? हे येत्या निवडणुकीत जनता दाखवून देईल," असं सडेतोड उत्तर सुजय विखेंनी दिलंय.