thumbnail

"स्वप्न भंग करण्यासाठी आम्ही सज्ज...", सुजय विखेंचा विरोधकांना टोला

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

शिर्डी : राज्यातील विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार. दरम्यान, भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. ते म्हणाले की, "राज्यात महायुतीच्या सरकारनं केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा महायुतीचं सरकार राज्यात येणार आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखे पाटलांना पाडण्याचं स्वप्न गेल्या 30 वर्षापासुन बघितलं जातंय. त्यांना स्वप्न बघु द्या, त्याचं स्वप्न भंग करण्यासाठी आम्ही आणि कार्यकर्ते सज्ज आहोत. माझ्या वडलांनी त्यांचा शिर्डी मतदारसंघात अनेक कामं केली आहेत. त्यांनी केलेली काम मी इतक्या जनतेपर्यंत पोहचवली. आता मी इतर मतदारसंघात जाण्यासाठी मोकळा झालोय," असं सुजय विखे म्हणाले.

"माझ्या वडीलांना महाराष्ट्रात मंत्री पदाची जबादारी असल्यानं त्यांच्यासाठी मी मतदारसंघात फिरतोय. संगमनेर मतदारसंघात जर थोरातांची इतकी चांगली परीस्थीती असेल किंवा संगमनेर मतदारसंघात माझा पराभव करणं सोपं असेल, तर मग आज स्वतः थोरात त्यांची मुलगी, घरातली सगळे फील्डवर का आहेत. चांगली परीस्थीती असती तर येवढ्या लोकांनी फिरायची आवश्यकता नव्हती. संगमनेरमध्ये परिवर्तन होणार," असं सुजय विखे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.