जखमी पित्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी मुलानं केली 18 किलोमीटरची 'कावडयात्रा'; पाहा व्हिडिओ - Gadchiroli News

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 2:25 PM IST

गडचिरोली Gadchiroli News : जिल्ह्यातील भामरागड तालुका म्हणजे अतिदुर्गम भाग. मुसळधार पावसानं या तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटतो. याच तालुक्यातील भटपार गावात शेतकाम करताना मालू केये मज्जी (वय-67) यांना पाय घसरून इजा झाली. मात्र, मुसळधार पाऊस, बंद रस्ते आणि दुथडी भरून वाहणारी नदी-नाले यामुळं त्यांना रुग्णालयात नेण्याची अडचण झाली. मालू मज्जी यांचा मुलगा पुसू यानं मात्र हिंमत न हारता खाटेची कावड केली. मित्रांच्या सहाय्यानं ही कावड पामुलगौतमी नदीतील नावेत टाकून पुन्हा एकदा पायी 18 किलोमीटर भामरागड गाठून वडिलांना रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भाग, साधनांची वानवा, दळणवळणाच्या अडचणी, नैसर्गिक अडचणी आणि हतबलता या घटनेनं उघड झाली. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.