रस्त्याअभावी गरोदर महिलेचे हाल; चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये बसून केला रस्ता पार - Plight Of Pregnant Woman - PLIGHT OF PREGNANT WOMAN
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 19, 2024, 5:10 PM IST
गडचिरोली PLIGHT OF PREGNANT WOMAN : जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील कुडकेली येथे धक्कादायक प्रकार घडला. रस्ता नसल्यामुळे गरोदर महिलेला चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये बसवून ओढा पार करावा लागला. यावरून गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य समस्या किती बिकट होते याची प्रचिती येते. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात अत्यंत महत्त्वाचा म्हणून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गाची ओळख आहे. आलापल्ली ते भामरागड या १३०-डी क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलं; मात्र रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्यानं मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे दोन दिवसापासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर रहदारी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे प्रवाशी कधी घरी पोहोचतील याची खात्री नाही.