केळी पिकविम्याचे पैसे मिळत नसल्यानं जळगावात शिवसेना ठाकरे गट आक्रमक - शिवसेना ठाकरे गट आक्रमक
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 31, 2024, 4:44 PM IST
जळगाव: गेल्या चार ते पाच महिन्यांपासून केळी पिकविम्याचा हप्ता (banana crop insurance) भरूनही विम्याची रक्कम मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. (ShivSena Thackeray Group Aggressive) जळगावात आज (31 जानेवारी) शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत पिकविमा कंपनीचं कार्यालय गाठलं आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कार्यालयातील खुर्च्या बाहेर फेकल्या. तसंच पोस्टर फाडून तीव्र संताप व्यक्त केला.
तर मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवू : पिकविमा कंपनीच्या कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. (Thackeray group Agitation Jalgaon) 4 फेब्रुवारीच्या आत जर केळी पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही तर 4 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेला मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.