बीड शहरात शिवजयंतीनिमित्त उत्साह; रात्री बाराच्या ठोक्याला आतिषबाजी, पाहा व्हिडिओ - Beed shiv jayanti celebration
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-02-2024/640-480-20785030-thumbnail-16x9-beed.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 19, 2024, 10:23 AM IST
बीड Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे. संपुर्ण राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. शिवजयंतीनिमित्त बीड शहरातही मोठा उत्साह पाहायला मिळतोय. रात्री बारा वाजता शहरातील शिवतीर्थ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आलीय. तसंच रात्री बारा वाजता जन्मोत्सवही साजरा करण्यात आलाय. याठिकाणी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. यावेळी तरुणांनी गाण्यावर ठेकाही धरला. शहरात गेल्या दोन वर्षांपासून रात्री बारा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून एक शिवज्योत काढण्यात येते. यावर्षीही रात्री बारा वाजता ही शिवज्योत काढण्यात आली. या कार्यक्रमात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आलाय.