मासेमारी करताना शार्क माशाचा हल्ला, पाय कुरतडल्यानं तरुण गंभीर जखमी - शार्क हल्ला
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 13, 2024, 10:58 PM IST
पालघर shark attack in Palghar: पालघर तालुक्यातील वैतरणा खाडीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय शार्क माशानं कुरतडल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. विकी गोवारी असं जखमी तरुणाचं आहे. आज संध्याकाळी मनोर येथील सायलेंट हॉटेल जवळील वैतरणा खाडीत काही तरुण मासेमारी करण्यासाठी गेले होते. खाडीच्या पाण्यात मासेमारी करताना अचानक शार्क माशानं विकीवर हल्ला केला. या हल्यात त्याचा पाय शार्कनं कुरतडला आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं तरुण बेशुद्ध पडला होता. त्यामुळं तरुणाला तातडीनं मनोर येथील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संध्याकाळी ही घटना समजताच मनोर येथील सायलेंट हॉटेल जवळ तरुणांची मोठी गर्दी जमली होती. शार्क माशाच्या हल्ल्यामुळं स्थानिक आदिवासी तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.