सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाटक प्रकरण; ललित कला केंद्राची भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड - BJP Yuva Morcha activists
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 3, 2024, 7:51 PM IST
पुणे Lalit Kala Kendra Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात शुक्रवारी (2 फेब्रुवारी) सायंकाळी रामायणावरून तुफान राडा झाल्याचा प्रकार घडला. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. परंतु या प्रयोगात घेतलेले रामायणातील पात्रच आक्षेपार्ह असल्याचं सांगत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तसंच यावेळी भाजयुमो कार्यकर्त्यांकडून नाटकातील कलाकारांना मारहाणही करण्यात आली. या घटनेप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. असं असतानाच आता ललित कला केंद्र भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. 'जय श्रीराम'चा नारा देत कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जाऊन ललित कला केंद्राची तोडफोड केली. तसंच केंद्राच्या फलकावर शाई फेकही करण्यात आली. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असताना देखील आज ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.