सातारा, कराडात पावसाची दमदार हजेरी, भात पिकांना मिळाली संजीवनी, मुख्यमंत्र्यांची होर्डींग मात्र पडली, पाहा व्हिडिओ - Satara Rain News - SATARA RAIN NEWS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 17, 2024, 11:00 PM IST
सातारा Satara Rain Updates : साताऱ्यात पावसानं विश्रांती घेतल्यामुळं आठवडाभर वातावरणात उष्मा जाणवत होता. उकाड्यानं नागरीक हैराण झाले होते. भात पिकांची अवस्था नाजूक बनली होती. अशात शनिवारी (17 ऑगस्ट) सायंकाळी ढगांच्या गडगडाटात पावसानं जोरदार हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. सातारा जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं खरीपातील पिकांना जणू संजीवनी मिळालीय. विशेषतः भात पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरला. तर दुसरीकडं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा' रविवारी (18 ऑगस्ट) साताऱ्यात पार पडणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. मात्र, जोरदार पावसामुळं या कार्यक्रमाचे होर्डिंग्स पडल्याचं बघायला मिळालं.