मिलीटरीच्या अधिकाऱ्यांनी केली सांगली येथील पूरस्थितीची पाहणी - Sangli Weather Update

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 2:55 PM IST

thumbnail
पूरस्थितीची पाहणी करताना इंडियन आर्मी (ETV Bharat Reporter)

सांगली Sangli flood: अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कृष्णा नदीला पूर आलं आहे. पाणी पातळी ४० फुटांवर पोहोचली आहे. कृष्णा नदीचे पाणी शहरातील पूरपट्ट्यातील सखल भागात शिरलं आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून इंडियन आर्मीला पाचारण करण्यात आले. पथकाकडून पूरपट्ट्यातल्या भागाची बोटीद्वारे पाहणी करण्यात येत आहे. सैन्यदलाच्या पथकासोबत महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील सहभागी झाले होते. सांगलीच्या पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सैन्य दलाचे 90 जवान,10 अधिकारी आपल्या ताफ्यासह पोहोचले आहेत. गेल्या 12 तासात कृष्णेच्या पाणी पातळीत केवळ 8 इंचाने वाढ झाली आहे. शहरातील पूरपट्ट्यातल्या सखल भागातील दत्तनगर, काका नगर, आरवाडे पार्क, सूर्यवंशी प्लॉट, ईदगाह मैदान परिसरात पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे 359 कुटुंबातील 1 हजार 459 लोकांचं तसंच 150 जनावरांचं आतापर्यंत स्थलांतर झालं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.