मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील - Radhakrishna Vikhe Patil - RADHAKRISHNA VIKHE PATIL

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 10:53 PM IST

नांदेड Radhakrishna Vikhe Patil : एकटे मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. मराठा समाजासाठी काम करणारे भरपूर लोक आहेत, असे सांगत मराठा आरक्षणाचे आंदोलन आता भरकटत चालले आहे, असे स्पष्ट मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

मराठा समाजास 10 टक्के आरक्षण : भाजपाच्या चिंतन बैठकीस पक्षनिरीक्षक म्हणून विखे रविवारी नांदेडमध्ये आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षण आणि जरांगे यांच्याबाबत केलेल्या या व्यक्तव्याने खळबळ उडाली आहे. शासकीय विश्रामगृह येथे बोलताना महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की, आमच्या सरकारने मराठा समाजास १० टक्के आरक्षण दिले आहे. सभागृहातही याबाबत निर्णय झाला आहे. परंतु, विरोधीपक्ष अजूनही आरक्षणाबाबत विरोधी भूमिका मांडत आहेत. एकटे मनोज जरांगे हे काही संपूर्ण मराठा समाज नाही. मराठा समाजाचे आंदोलन आता भरकटत चालले आहे. यामुळे आंदोलनाचे गांभीर्य कमी आले आहे. मराठा समाजासाठी काम करणारे भरपूर लोक आहेत. आम्हीसुद्धा ग्राउंड लेव्हलवर काम करतो तर जरांगे यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.