वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या काळवीटाचा मृत्यू, वेळीच उपचार देण्याचे प्रयत्न ठरले फोल - साईनगर शिर्डी
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 3, 2024, 2:07 PM IST
|Updated : Mar 3, 2024, 2:17 PM IST
शिर्डी Reindeer Death : साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकाच्या कमानीजवळ आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास नगर - मनमाड महामार्गावर एक काळवीटला अज्ञात वाहनानं धडक दिलीय. या जोरदार धडकेत काळवीट रंक्तबंबाळ झालं. भर रस्त्यावर पडलेल्या काळवीटला स्थानिकांनी रस्त्याच्या कडेला आणलं. काळविटाला पाणी पाजून त्यांच्यावर उपचार व्हावेत म्हणून प्राणीमित्र स्वप्निल जोशी यांनी वन विभागाला संपर्क केला. मात्र नेहमीप्रमाणे सुस्तावलेलं वनविभाग अखेर दोन तासाच्या प्रतिक्षेनंतर दाखल झालं. काळविटाला पुढील उपचारासाठी घेवून गेले. मात्र उपचारा दरम्यान काळवीटाचा मृत्यू झालाय. दोन तास रस्त्याच्या कडेला पडलेल्या या काळवीटाचं वय 3 वर्षे आहे. वेळेत उपचार न मिळाल्यानं काळवीटाचा मृत्यू झाला असावा, अस बोललं जातंय. याआधी देखील अशाच एका काळविटाचा उपचारा अभावी मृत्यू झाला होता.