भावाला बांधा आणि खा चॉकलेटची राखी, विविध पद्धतीच्या राख्या बाजारात दाखल; पाहा व्हिडिओ - Chocolate Rakhi - CHOCOLATE RAKHI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 18, 2024, 4:54 PM IST
पुणे Raksha Bandhan Special Rakhi : रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हा पवित्र सण यावर्षी 19 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील बाजारपेठेत विविध प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. तर रक्षाबंधन सणाचं औचित्य साधत पुण्यातील मूर्तीज बेकरीकडून चॉकलेटच्या राख्या बनवण्यात आल्या आहेत. येथील गुलाब, बाहुली, कार्टून अशा विविध प्रकारच्या चॉकलेटच्या राख्या खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनी गर्दी करताना पाहायला मिळत आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या मूर्तीज बेकरीमध्ये गेल्या 10 ते 12 वर्षांपासून या चॉकलेटच्या राख्या करण्यात येत असल्याचं दुकानदार विक्रम मूर्ती यांनी सांगितलं.