500हून अधिक कलाकारांच्या माध्यमातून शंखनाद करत बाप्पाला निरोप, पहा व्हिडिओ - pune ganpati visarjan 2024 - PUNE GANPATI VISARJAN 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 17, 2024, 11:52 AM IST
पुणे- अनंत चतुदर्शीनिमित्त आज पुण्यात मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू झाली आहे. गणेशभक्तांचा सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. "गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया..पुढच्या वर्षी लवकर या..." असे म्हणत ढोल-ताशांच्या गजरात, सनई-चौघड्याच्या निनादात आणि उत्साहात आनंदात पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला वाजत-गाजत सुरुवात झाली आहे. पुण्याची मुख्य मिरवणूक महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि मानाच्या पाचही गणपतींची आरती होऊन मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. त्याआधी पुण्यातील केशव शंखनाद पथकाच्या माध्यमातून मंडई येथे तब्बल 500 कलाकारांच्या माध्यमातून शंखनाद करत बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. देशभरातून गणेशभक्तांनी आणि पर्यटकांनी पुण्यातील गणेशोत्सव पाहण्याकरिता गर्दी केल्याचं दिसून येत आहे.