इंद्रायणी नदीत दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; एक मित्र बुडू लागला म्हणून इतर दोघे गेले अन्... - Indrayani Drown Death News - INDRAYANI DROWN DEATH NEWS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 8:25 PM IST

पिंपरी : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीत दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. तर एक विद्यार्थी बेपत्ता आहे. दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले आहेत. प्रणव पोतदार (वय 17 वर्ष) असं बेपत्ता विद्यार्थ्याच नाव आहे. इंद्रायणी नदीत आश्रम शाळेतील 50 ते 60 विद्यार्थी जलपूजनासाठी गेले होते. त्यादरम्यान नदीपात्रात एका विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडू लागला. त्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी इतर दोन विद्यार्थ्यांनी पाण्यात उडी मारली. त्यादरम्यान ते दोन्ही विद्यार्थी देखील बुडाले. विद्यार्थ्यांना नदीत जाण्यासाठी गुरुकुल आश्रमानं कशी काय परवानगी दिली? असा सवाल नागरिक विचारत आहेत. गुरुकुल आश्रमाच्या संचालकांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी देखील मागणी होत आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.