कराडमध्ये बेंदूर सणानिमित्त 'सर्जा राजा'ची डीजेच्या दणदणाटात मिरवणूक, पाहा व्हिडिओ - Bendur festival in Karad - BENDUR FESTIVAL IN KARAD
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 20, 2024, 11:28 AM IST
सातारा Bendur Festival 2024 : वर्षभर कष्टाचं काम करुन बळीराजाला इमानेइतबारे साथ देणाऱ्या बैलांची सेवा करण्याचा सण म्हणजे बेंदूर. यादिवशी बैलांना विश्रांती दिली जाते. बैलांची खांदेमळणी अर्थात गरम पाण्यानं बैलांचे खांदे शेकले जातात. बैलांच्या शिंगाना रंगरंगोटी करुन रंगीबेरंगी गोंडे बांधले जातात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो आणि बैलांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. आतापर्यंत बेंदूर सण अशा पारंपरिक पध्दतीनं साजरा केला जात असे. मात्र, बेंदूर सणाचं स्वरुपही आता बदलत चालल्याचा प्रत्यय कराडमधील मिरवणुकीत आला. कराडमध्ये शेतकरी दरवर्षी बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची सवाद्य मिरवणूक काढतात. परंतु, यंदाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांऐवजी चक्क डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक काढण्यात आलीय. मंगळवार पेठेतून मुख्य टपाल कार्यालयमार्गे मुख्य बाजारपेठेतून डीजेच्या दणदणाटात निघालेली बैलांची मिरवणूक आणि शेतकऱ्यांचा उत्साह पाहायला व्यापाऱ्यांनी देखील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.