पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरातुन फुंकणार राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग; पाहा व्हिडिओ - PM Narendra Modi in Chandrapur - PM NARENDRA MODI IN CHANDRAPUR
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 8, 2024, 1:14 PM IST
चंद्रपूर PM Narendra Modi in Chandrapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यातुन प्रचार करण्याची सुरुवात चंद्रपूर येथून करण्याचं ठरवलंय. त्यानुसार आज मोरवा इथं त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. तीन लोकसभा क्षेत्रांना लक्षात घेऊन या सभेचं आयोजन करण्यात आलंय. चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम आणि गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राला लक्षात घेऊन या सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच तिन्ही लोकसभा क्षेत्राचे उमेदवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या सभेला 50 हजारांहून अधिक लोक सहभागी होऊ शकणार अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय. सायंकाळी चार वाजता ही सभा सुरु होणार आहे. यासाठी मोरवा विमानतळाजवळ 16 एकर जागेवर सभा घेण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. यापूर्वी नरेंद्र मोदी हे 2014 ला चंद्रपुरात प्रचार करण्यासाठी आले होते. आता या सभेत मोदी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.