मोदींचं मिशन मुंबई! होर्डिंग दुर्घटना झालेल्या घाटकोपरमध्ये पंतप्रधानांचा रोड 'शो'; पाहा व्हिडिओ - Modi Road Show - MODI ROAD SHOW
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 15, 2024, 9:12 PM IST
मुंबई PM Narendra Modi Road Show : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्याच्या राजधानीतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मुंबईतील सर्व मतदारसंघ जिंकण्यासाठी सर्वच उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलाय. त्यातच आज महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये रोड शो केला. भाजपाचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी हा रोड शो करण्यात आला. घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल जवळून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली. या रोड शोचा घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ समारोप झाला. मात्र या रोड शोमुळं ईशान्य मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोसाठी घाटकोपरच का निवडण्यात आलं याला महत्त्वाचं राजकीय कारण आहे. ते म्हणजे मोदींच्या या रोड शोचा मुंबईतील सहापैकी पाच लोकसभा मतदारसंघांवर थेट परिणाम होणार आहे.