पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; परळीत मुंडे समर्थकांकडून जल्लोष - Pankaja Munde News - PANKAJA MUNDE NEWS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 1, 2024, 10:25 PM IST
बीड Pankaja Munde News : पंकजा मुंडेंना भाजपाकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बीड आणि परळीत मुंडे समर्थकांनी जल्लोष केला. बीडच्या भाजपा मध्यवर्ती कार्यालाबाहेर तर परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समस्त मुंडे समर्थकांनी एकत्र येत हा जल्लोष केलाय. यावेळी पंकजा मुंडे यांच्या नावानं घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडत हा जल्लोष साजरा होत आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा निसटता पराभव झाला होता. या पराभवानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. मात्र अखेर भाजपाकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी समर्थकांकडून केली जात होती. आता डूबती नाव वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची संधी दिली असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय.