छत्रपती शिवाजी महाराज यांचा दृष्टांत... म्हणून मी बारामतीतून लढवणार निवडणूक - नामदेव जाधव - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 3, 2024, 8:02 PM IST
पुणे Namdev Jadhav on Baramati : राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून (Baramati Lok Sabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनं सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या निवडणूक लढवणार आहेत. पवार कुटुंबात ही निवडणूक होत असताना आता लेखक नामदेव जाधव (Namdev Jadhav) हे देखील बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवणार असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांनी याबाबत दृष्टांत दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणून ते बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत खुद्द लेखक नामदेव जाधव यांनी सांगितलं की, दोन दिवसांच्या पूर्वी पहाटे चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांनी मला दृष्टांत दिला. त्यामुळे आई भवानीचा आशीर्वाद आणि मावळ्यांची साथ घेऊन स्वराज्यासाठी लोकसभा निवडणूक लढवणार आहे.