पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना ७ लाख ९३ हजार रुपयांची रोकड जप्त, पहा व्हिडिओ - MONEY SEIZE IN NAGPUR
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 24, 2024, 9:20 AM IST
|Updated : Oct 24, 2024, 12:21 PM IST
नागपूर: शहरातील सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत एका संशयित व्यक्तीकडून ७ लाख ९३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. उमेश रामसिंग ऐदबान असे संशयित व्यक्तीचं नाव आहे. संशयित व्यक्ती हा शहरातील मानेवाडा येथील रहिवासी आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरात जागोजागी संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. सीताबर्डी पोलिसांकडून महाराजबाग परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना विद्यापीठाच्या परिसरात दुचाकीस्वाराकडं ७ लाख ९३ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. सीताबर्डी पोलिसांनी रोख रकमेसह दुचाकी जप्त केली आहे. चौकशी सुरू असताना संशयिताकडून उडवाउडीचे उत्तर देण्यात आल्यानं पोलिसांचा संशय बळावला आहे. ही रक्कम निवडणूक काळात आढळल्यामुळे निवडणूक विभागाकडे दिली जाईल, अशी माहिती सीताबर्डी पोलिसांनी दिली. मतदारांना प्रलोभन दाखविण्याकरिता राजकीय पक्षांकडून मतदारांना पैशांचे वाटप होण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून निवडणुकीच्या काळात वाहनांची तपासणी केली जाते.