म्हैस रस्त्यावर आल्यानंतर भरधाव वाहनानं अनेक वाहनांना उडवलं हवेत, पाहा व्हिडिओ - Nagpur Accident - NAGPUR ACCIDENT

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 7:07 AM IST

नागपूर Nagpur Accident : नागपूर शहरातील मानकापूर चौकात रविवारी रात्री भीषण अपघात झालाय. भरधाव वेगातील अनियंत्रित वाहनानं सिग्नलवर उभ्या असलेल्या सुमारे पाच ते सात गाड्यांना अक्षरशः हवेत उडवलंय. हा अपघात इतका भीषण होता की, काही कार तर एकमेकांवर जाऊन आदळल्या आहेत. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत भरपूर वर्दळ असते. त्यातच वाहनाचा वेग जास्त असल्यानं वाहन अनियंत्रित झाले. या अपघातात एका रुग्णवाहिकेचं बरंच नुकसान झालंय.  तर अनेक गाड्यांचा चुराडा झालाय. या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर परिसरात बराच वेळ तणावाचं वातावरण होतं. तसच यामुळं वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर एक म्हैस आल्यानंतर कार उलटली. त्यानंतर एकामागून एक वाहनांना धडक झाली.  त्यामुळे अनेक वाहनांचा ढीग झाला, परिणामी सहा जण जखमी झाले. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी घटनास्थळी भेट दिली.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.