"यापुढं धमकीचं वक्तव्य केल्यास...", राणेंविरोधात सेवानिवृत्त पोलीस आक्रमक - Police Aggressive Against Rane - POLICE AGGRESSIVE AGAINST RANE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 4, 2024, 10:55 PM IST
सातारा : माजी खासदार निलेश राणे आणि भाजपाचे आमदार नितेश राणेंनी पोलिसांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात चांगलाच वाद उफाळून आलाय. राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आल्यानंतर राडा झाला. त्यावेळी निलेश राणेंनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये 24 ऑगस्ट रोजी त्यांची सभा होती. या सभेत वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत, अशी नोटीस देण्यासाठी गेलेल्या पोलिसाला नितेश राणेंनी एकेरी भाषा वापरली. सरकार कुणाचं आहे, गृहमंत्री कोण आहेत ते बघा. पोलिसांनी माझ्या नादाला लागू नये, असं ते म्हणाले. यापूर्वीही त्यांनी अनेकदा पोलिसांना बदलीची धमकी दिलीय. त्यामुळे साताऱ्यातील सेवानिवृत्त पोलीस बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य असलेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत नितेश राणे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध केला. दिवस रात्र परिश्रम घेणाऱ्या पोलिसांना नितेश राणे धमकावत आहेत. परंतु, पोलीस बदलीला घाबरत नाही, यापुढं धमकीचं वक्तव्य केल्यास निवडणुकीत पोलिसांचेच कुटुंबीय तुम्हाला त्यांना इंगा दाखवतील, असा इशाराही सेवानिवृत्त पोलिसांनी दिला.