सत्तेच्या लालसेनं उद्धव ठाकरेंनी हिदुत्व सोडलं; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

अहमदनगर Minister Vikhe Patil : श्रीराम मंदिराचं निमंत्रण नाकारणाऱ्यांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाचार घेतलाय. (Uddhav Thackeray) निमंत्रण नाकारून काँग्रेसने कोट्यवधी राम भक्तांचा अपमान केलाय. (Ram Mandir Inauguration Issue) काँग्रेसनं देशाची माफी मागावी. हा सोहळा कुठला राजकीय नाही. (Vikhe Patil Criticism Thackeray) हा सर्वांनाचा सोहळा आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववाद कधीच सोडला असल्याची घणाघाती टीका महसूलमंत्री विखे पाटील यांनी शनिवारी (20 जानेवारी) केलीय.

सत्तेच्या लालसेनं हिदुत्व सोडलं : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगानं अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे मंदिर स्वच्छता अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. (Politics) यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाषणातून महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा अयोध्येच्या राम मंदिराचं निमंत्रण नाकारल्यावरून समाचार घेतलाय.  

काँग्रेसनं माफी मागावी : ठाकरे यांनी हिंदुत्ववाद कधीच सोडला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या चिरंजीवानं हिंदुत्वाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. अशांच्या मांडीला मांडी लावून ठाकरे बसतात. औरंगजेबाच्या कबरीवर फुलं उधळताना त्यावेळी ठाकरे मुख्यमंत्री असूनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. (India Politics) कॉंग्रेसनं राम मंदिराचं निमंत्रण नाकारणं हा असंख्य राम भक्तांचा अवमान आहे. सत्तेच्या लालसेनं ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडल्याची घणाघाती टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.