एकदा कायदा झाला की सगळं व्यवस्थित होईल; अन्यथा ‘या’ तारखेला उपोषण करणार - जरांगे पाटील - मनोज जरांगे पाटील
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 31, 2024, 7:08 PM IST
पुणे (खेड) Maratha Reservation : आज मनोज जरांगे पाटील यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड आणि परिसरातील नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या. एकदा कायदा झाला की सगळं व्यवस्थित होईल अशी अपेक्षा त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलीय.
नाही तर 10 फेब्रुवारीपासून उपोषण : मनोज जरांगे पाटील यांनी आज अनवाणी पायांनी किल्ले रायगडच दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी खेड तालुक्यातील कुरुडी येथे नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. सग्यासोयऱ्याबाबत महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढला आहे. त्याचं 15 दिवसातच विशेष अधिवेशन बोलावून कायद्यात रुपांतर करावं. उद्यापासून तातडीने अंमलबजावणी नाही केली तर 10 फेब्रुवारीपासून उपोषण करणार असल्याची माहिती, जरांगे पाटील यांनी दिलीय.