उपोषण पीएचडी विद्यार्थ्यांसाठी नाही तर मराठा आरक्षणासाठी; मनोज जरांगेंनी सारथीच्या विद्यार्थ्यांना झापलं
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 13, 2024, 11:14 AM IST
जालना Manoj Jarange Angry on Students : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा अंतरवली सराटी या गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐकदा तापला आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केल्यानंतर त्यांच्यासोबत सारथीच्या विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं आहे. मात्र उपोषण करणाऱ्या सारथीच्या विद्यार्थ्यांना मनोज जरांगे यांनी चांगलच झापलं आहे.
मागच्या अठरा महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्यानं सारथीचे विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना विद्यार्थी फक्त पीएचडी पुरतंच बोलतात. त्यामुळं मनोज जरांगे चांगलेच संतापले असून "हे उपोषण पीएचडीसाठी नाही, तर मराठा आरक्षणासाठी आहे. तुम्ही तुमचच बोलत आहात. आरक्षणाचा कुणी विषयच मांडत नाही. तुम्ही पीएचडी केली म्हणून हुशार समजता का. अशी नियत असल्यावर जातीचं केव्हा चांगलं व्हायचं," असं म्हणत मनोज जरांगे यांनी सारथीच्या उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना चांगलच झापलं आहे.