"राज ठाकरेंना गांभीर्यानं घेत नाही...", महेश तपासे यांचा टोला - Mahesh Tapase on Raj Thackeray - MAHESH TAPASE ON RAJ THACKERAY

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 9:24 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरु झालं, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "शरद पवार यांना जातीयवादी ठरवण्याची सुपारीच राज ठाकरे यांनी घेतली आहे. राज ठाकरे यांच्या या संपूर्ण वक्तव्याची स्क्रिप्ट भाजपानं लिहिली आहे का?" असा सवाल महेश तपासे यांनी केलाय. "प्रत्येक निवडणुकीला त्यांच्या पक्षाची भूमिका बदलत असते. राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करून बराच काळ लोटला आहे, पण एवढ्या वर्षात महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना कधीच स्वीकारलं नाही. पवार साहेबांचं नाव घेऊन प्रसिध्दी मिळवायची असेल तर मिळवा," असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.