"शेतकऱ्यांपुढे एकनाथ शिंदे महत्त्वाचे नाहीत", नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? पाहा व्हिडिओ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 28, 2024, 2:08 PM IST
अमरावती Bachchu Kadu On Eknath Shinde : सरकार अनेक बदलले. पण शेतकऱ्यांबद्दलचे धोरण अजून बदलले नाही. त्यामुळेच मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही या राज्यातला शेतकरी महत्त्वाचा वाटतो, असं विधान करून प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला. ते तिवसा येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. "माणसाच्या अंगात ताकद किती आहे. यापेक्षा डाव कसा मारता येईल हे महत्त्वाचं आहे. आमची पार्टी दोन आमदाराची जरी असली तरी एकटा बच्चू कडू शंभर आमदारांना पुरेसा आहे. आम्ही चितपट केल्याशिवाय राहत नाही. सभागृहात कोण बसलाय? कोण नाही, याची आम्ही चिंता करत नाही. शेतकरी आमचा बाप असून कोणताही नेता आमचा बाप होऊ शकत नाही. जातपात-धर्म बाजूला ठेवून आता खरी लढाई शेतकऱ्यांची लढली गेली पाहिजे. आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या सर्वांची सरकार आली. परंतु कोणत्याही सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत. आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी काम करतो, आमच्या दृष्टीने तोच महत्त्वाचा आणि मोठा आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.