LIVE : लोकसभा निवडणुका जाहीर; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद लाईव्ह
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा (ECI announce Election schedule) झालीय. भारतीय निवडणूक आयोगानं (Election commission of India) पत्रकार परिषद घेत तारखा जाहीर केल्या आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे सोशल मीडियातून लाईव्ह (Lok Sabha Election 2024 Date LIVE) प्रसारण करण्यात आलं. निवडणूक तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू झालीय. त्यामुळं आता खऱ्या अर्थानं निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केलीय. तसंच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. महायुतीमधील जागावाटपाबाबत अंतिम निर्णय नाही - भारतीय जनता पक्षानं लोकसभेच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या यादीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं आहेत. यामध्ये भाजपा नेते पंकजा मुंडे व सुधीर मुनंगटीवार यांचादेखील समावेश आहे. दुसरीकडं महायुतीमधील जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
Last Updated : Mar 16, 2024, 4:33 PM IST