हजारो प्रकारची फुलं आणि झाडी एकाच छताखाली, कोल्हापुरात पुष्प प्रदर्शनाचं आयोजन; पाहा व्हिडिओ - FLOWER EXHIBITION IN KOLHAPUR
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/08-12-2024/640-480-23067260-thumbnail-16x9-kolhapur-flower-show.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Dec 8, 2024, 7:48 AM IST
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर गार्डन्स क्लबच्या वतीनं कोल्हापुरात भव्य पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या पुष्प प्रदर्शनात शेकडो प्रकारची फुलं, रोपं, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ गंधराज फुलं ठेवण्यात आली आहेत. विविध रंगांची, आकारांची आणि प्रकारांची फुलं प्रदर्शनात बघायला मिळत असून ही मनमोहक फुलं पाहण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी आणि वृक्ष प्रेमी इथं गर्दी करत आहेत. तसंच या प्रदर्शनात गार्डनिंगशी संबंधित कार्यशाळा आणि गार्डन डेकोरेशनसाठी टिप्स देणारे कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले आहेत. या बरोबरच इथं अनेक स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलंय. यामध्ये विविध प्रकारची फुलं, पुष्परचना, कुंडीतील रोपे, फुलं, पाने आणि पाकळ्यांची रांगोळी, बुके, डेकोरेशन, बोन्साय, मुक्त रचना आदींचा समावेश आहे. दरम्यान, या प्रदर्शनामुळं कमी जागेत उत्तमरित्या बाग कशी साकारायची याचे नमुनेदेखील दाखवण्यात येत असल्याची माहिती गार्डन्स क्लबच्या सभासद वर्षा वायचळ यांनी दिली.