कोकणी माणसाची 'गटारी' जोरात; चिकन मटणाच्या दुकानावर नागरिकांच्या रांगा - Gatari Amavasya 2024
🎬 Watch Now: Feature Video
सिंधुदुर्ग(कुडाळ) : आज गटारी म्हणजे दीप अमावस्या आहे. उद्यापासून श्रावण मास सुरू होत असल्यानं आज मासे, मटण, चिकन खरेदीसाठी कोकणातील बाजारात मोठी गर्दी दिसून आली. समुद्रातील वादळाची तीव्रता कमी झाल्यानं बांगडा, सुरमई, मोरीला "बंपर कॅच" मिळाला आहे. मासे खरेदीला नागरिकांनी गर्दी केली होती. गटारी अमावस्या कोकणात मोठ्या उत्साहात साजरी होते. घरोघरी मांसाहाराचा बेत असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे मच्छी आणि मटण मार्केटमध्ये आज बांगडे 200 रुपयाला 5, सुरमई 1300 रुपये प्रति किलो, कोळंबी 300 रुपये प्रति किलो, पापलेट 1200 रुपये प्रति किलो, मोरी 1000 रुपये किलो दर होते. तसेच मटण 700 रुपये किलो, चिकन 280 रुपये किलो असे दर होते. धार्मिक भावनांमुळे अनेक कुटुंबात श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही. त्यामुळे श्रावणापूर्वी बाजारात मोठी गर्दी दिसून आले.