साईनगरीत 'कोजागरी पौर्णिमा' उत्साहात साजरा; पाहा व्हिडिओ - KOJAGARI PURNIMA 2024

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2024, 11:16 AM IST

शिर्डी : शिर्डीत साई संस्‍थानच्या वतीनं 'कोजागरी पौर्णिमा' (Kojagari Purnima 2024) मोठ्या उत्साहात साजरा करण्‍यात आली. कोजागरी पौर्णिमेनिमित्त साईबाबा समाधी मंदिर (Saibaba Temple Shirdi) समोरील स्टेजवर कलाकारांच्या वतीनं रात्री 7 ते 11 पर्यंत धार्मिक कार्यक्रमांचं आयोजत करण्यात आलं होतं. त्यानंतर रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत साईबाबा मंदिरात साई संस्थानच्या उपकार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते अभिषेक पूजा तसंच लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर चंद्र पुजा करण्यात आली. सं म्हटल्या जातं की कोजागरी म्हणजेच शरद पौर्णिमेच्या दिवशी दुधामध्ये चंद्र पहिल्यानं आरोग्य प्राप्ती होते. चंद्र पुजेनंतर रात्री 12.10 वाजता श्रींची शेजारती संपन्न झाली. शेजारतीनंतर साई संस्थानच्या वतीनं केसर, बदाम, काजू टाकून तयार केलेलं 400 लीटरचं दूध प्रातिनिधीक स्‍वरुपात प्रसाद म्‍हणून वाटप करण्‍यात आले. यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.