शिकाऊ चालकानं ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबल्यानं तिघांना उडवलं; कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू - Mumbai Accident News - MUMBAI ACCIDENT NEWS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 23, 2024, 1:58 PM IST
मुंबई Mumbai Accident News : मुंबईतील कांदिवलीमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथं एका शिकाऊ कार चालकानं ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्यानं कारचं नियंत्रण सुटलं. काही क्षणातच कारनं रस्त्यावरून पायी चालणाऱ्या एका महिलेसह तिघांना जोरदार धडक दिली. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना कांदिवलीच्या पोईसर परिसरात 21 जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली. अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी मदतकार्य करीत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. जोरात धडक बसल्यामुळं महिलेचा मृत्यू झाला. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कांदिवली पोलिसांनी हलगर्जीपणे कार चालवणाऱ्या व्यक्तीला आणि कार मालकाला अटक केली आहे.