गौतम अदानींच्या शिर्डी दौऱ्यात भाजपाच्या 'या' माजी खासदारानं चालविली गाडी, पहा उद्योगपतीच्या साईदर्शनाचा व्हिडिओ - GAUTAM ADANI SHIRDI DARSHAN - GAUTAM ADANI SHIRDI DARSHAN
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 15, 2024, 8:26 PM IST
शिर्डी (अहमदनगर) : देशातील उद्योगपती गौतम अदानी यांनी आज शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं सपत्नीक दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साईबाबांच्या समाधीवर फुलांसह पांढरी शाल अर्पण केली. त्यानंतर गौतम अदानी यांनी पत्नीसह द्वारकामाई तसंच गुरुस्थानला भेट देत दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते साईबाबांची पिवळ्या रंगाची शाल, पांढऱ्या रंगाची साईमूर्ती देवून दोघांचाही सत्कार करण्यात आलाय. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर गौतम अदानी यांच्यासह त्यांची पत्नी मंदिराच्या व्हीआयपी प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांची गाडी माजी खासदार सुजय विखे यांनी चालवली. त्यानंतर अदानी यांचा ताफा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या निवासस्थानी रवाना झाला.