टीम इंडिया मायदेशी परतली, चाहत्यांकडून जंगी स्वागत; पाहा व्हिडिओ - Team India Back To Country - TEAM INDIA BACK TO COUNTRY
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 4, 2024, 11:17 AM IST
नवी दिल्ली Team India Welcome : आज (4 जुलै) विश्वविजेती टीम इंडिया चमचमती ट्रॉफी घेऊन मायदेशी परतली. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर टीम इंडियाचं सकाळी 6 वाजेच्या आसपास आगमन झालं. यावेळी टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी दिल्ली विमानतळावर मोठी गर्दी केली होती. टीम इंडिया विमानतळाबाहेर येताच चाहते इंडिया-इंडियाच्या घोषणा देत होते. यावेळी टीमसाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. विमानतळावरुन टीम इंडिया आयटीसी मौर्य हॉटेलात पोहोचली. मौर्य हॉटेलमध्ये विराट कोहलीसह इतर खेळाडुंनी केक कापून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर टीम इंडिया दुसर्या चार्टर्ड फ्लाईटनं मुंबईसाठी रवाना होईल. मुंबईमध्ये विश्वविजेत्या टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक निघणार आहे. त्यामुळं पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय.