मी फडणवीस यांना ट्विटरवर फॉलो करत नाही; आदित्य ठाकरेंचा पलटवार - आदित्य ठाकरे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 21, 2024, 11:01 PM IST
पुणे Aditya Thackeray: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील कारसेवेच्या संदर्भातील एक फोटो ट्विट केला आहे. (Aditya Thackeray taunts Fadnavis) याबाबत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, मी ते पाहिलं नाही. आम्ही ट्विटरवर फडणवीसांना फॉलो करत नाही. (Fadnavis CarSeva)
तर 'त्या' भ्रष्टाचाराची चौकशी करू : युवासेनेच्या वतीनं पुण्यात युवा खेळ समिटचं आयोजन करण्यात आलं होतं. याच्या समारोपाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. (Politics) यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात जेव्हापासून खोके सरकार बसलं आहे तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहेत. (Maharashtra Politics) प्रशासक बसून खोके सरकार भ्रष्टाचार करत आहे. यावर आमचं सरकार आल्यावर फेअर आणि फ्री चौकशी करू आणि जे काही दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकू. (India Politics) तसेच शिंदे गटाला हा इशारा नाही तर त्यांना देखील माहीत आहे की, निवडणुकीपर्यंत भाजप त्यांना सोबत ठेवणार आहे आणि मग सोडून देणार आहे.
ही तर मालक सोडून कर्मचाऱ्याला अटक : यावेळी आदित्य ठाकरे यांना खिचडी घोटाळ्याबाबत सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे त्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, 22 तारखेला याबाबत केस आहे. एक गोष्ट त्यांच्याकडून स्पष्ट झाली पाहिजे की, ज्यांची कंपनी होती ते संजय माशेलकर जे आता शिंदे गटाबरोबर आहे, ते कंपनीचे मालक असताना ते बाहेर आहे आणि कर्मचाऱ्याला अटक होते. हा कुठला न्याय आहे? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.