मी बंडखोर नाही तर काँग्रेस विचारांचा पाईक, पर्वतीमध्ये सांगली पॅटर्न राबविणार - आबा बागूल
Published : 2 hours ago
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामला सुरुवात झाली असून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच उमेदवारी जरी जाहीर झाली असली तरी महायुती तसंच महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंड पाहायला मिळत आहे. पुण्यात तर काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडूनच बंड पुकारण्यात आलं असून गेली 40 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून देखील निष्ठावंतांवर काँग्रेस पक्षाकडून अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागूल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांनी स्वतःला बंडखोर न सांगता आपण काँग्रेस विचारांचेच पाईक असल्याचं म्हटलंय. तसंच आता त्यांनी काँग्रेसच्या निष्ठावंतांना एकत्र करणार असल्याची भूमिका व्यक्त करत पुण्यातील पर्वती मतदार संघात देखील आम्ही सांगली पॅटर्न राबविणार असल्याचं सांगितलं. आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी काँग्रेस नेते आबा बागूल यांच्याशी खास बातचीत केली आहे, पाहूया....