चट्टोग्राम South Africa Biggest Test Victory : बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना चट्टोग्राम येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं अवघ्या 3 दिवसांत हा सामना जिंकून मालिकाही जिंकली. यासह दक्षिण आफ्रिकेनं आशियातील मालिका जिंकण्याची प्रदीर्घ प्रतीक्षाही संपवली. त्यांनी 10 वर्षांनंतर आशियामध्ये कसोटी मालिका जिंकली. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयाचा हिरो ठरला कागिसो रबाडा. कागिसो रबाडानं पहिल्या सामन्यातही अप्रतिम गोलंदाजी केली होती.
Series Victory Sealed! 🏆🏏🇿🇦
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 31, 2024
The Proteas clinch a 273-run win in the second Test, taking the series 2-0 against Bangladesh!
An all-round performance from our bowlers and batters, and pure Proteas passion from start to finish.
Proud of Team South Africa. Proud of the… pic.twitter.com/ooZ27MbbWv
आफ्रिकेचा सर्वात मोठा विजय : दक्षिण आफ्रिकेनं हा सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यात बांगलादेशचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले, त्यामुळं दक्षिण आफ्रिकेनं हा सामना एक डाव आणि 273 धावांनी जिंकला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा हा सर्वात मोठा विजय आहे. बांगलादेशचा संघ दोन डाव एकत्र करुनही दक्षिण आफ्रिकेच्या एका डावात बरोबरी करु शकला नाही आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. याआधी दक्षिण आफ्रिकेनंही मालिकेतील पहिल्या सामन्यात 7 विकेट्सनं विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत बांगलादेशला त्यांच्याच घरच्या मैदानावर क्लीन स्वीप देण्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ यशस्वी ठरला.
South Africa seal the series 2-0 with a record win in Chattogram against Bangladesh 👏#WTC25 | #BANvSA 📝: https://t.co/C5XNFRbEJ3 pic.twitter.com/FobA13NI8t
— ICC (@ICC) October 31, 2024
दक्षिण आफ्रिकेनं उभारली डोंगरासारखी धावसंख्या : या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं अप्रतिम कामगिरी केली. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. दक्षिण आफ्रिकेनं 6 विकेट गमावून 575 धावा करुन पहिला डाव घोषित केला. यादरम्यान टोनी डी जोर्जी, ट्रिस्टन स्टब्स आणि वियान मुल्डर यांनी शतकी खेळी खेळली. टोनी डी जोर्झीनं 269 चेंडूत 177 धावा केल्या, ट्रिस्टन स्टब्सनं 106 धावांचं योगदान दिलं आणि विआन मुल्डर 105 धावांवर नाबाद राहिला.
Dutch-Bangla Bank Bangladesh 🆚 South Africa Test Series 2024 | 2nd Test
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 31, 2024
Result | South Africa won by an innings and 273 runs#BCB #Cricket #BANvSA #WTC25 #TestCricket pic.twitter.com/4zbx5Bd24F
बांगलादेशची फलंदाजी गडगडली : प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात केवळ 159 धावा करु शकला. या काळात कागिसो रबाडानं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. या खराब कामगिरीमुळं बांगलादेशला फॉलोऑनला सामोरं जावं लागलं. मात्र दुसऱ्या डावातही बांगलादेशचे फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाहीत. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात केवळ 143 धावांत गारद झाला. या डावात केशव महाराजनं सर्वाधिक 5 बळी घेत संघाला विजयापर्यंत नेलं.
SOUTH AFRICA WON A TEST SERIES IN ASIA AFTER 10 YEARS...!!!! 🏆
— Johns. (@CricCrazyJohns) October 31, 2024
- WTC is getting closer & closer. pic.twitter.com/haKcVrR3XZ
हेही वाचा :