"महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार येणार"; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 29, 2024, 5:26 PM IST
|Updated : Oct 29, 2024, 5:49 PM IST
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये आज (29 ऑक्टोबर) अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, प्रवीण दटके, मिलिंद माने आणि सुधाकर कोहळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खास संवाद साधला.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, आम्ही विधानसभा निवडणुकीत चांगल्या फरकानं निवडूण येऊ. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणार. तसंच महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार बनणार." नवाब मलिक यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "त्यांच्या उमेदवारीबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही, अधिकृत माहिती मिळाल्यावर आमचे प्रवक्ते त्यावर प्रतिक्रिया देतील. महायुतीकडून एकनाथ शिंदेंनी विद्यमान आमदार सदा सरवणकरांना तिकीट दिलंय. सरवणकर माहीम मतदारसंघातून माघार घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना ते म्हणाले, "मी नागपूरमध्ये असल्यानं बाहेर काय चाललं ते मला माहीत नाही.