उमेदवाराची होतेय जोरदार चर्चा; मावळ्याच्या वेशात घोड्यावर स्वार होत उमेदवारी अर्ज केला दाखल - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/30-10-2024/640-480-22797419-thumbnail-16x9-pune.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Oct 30, 2024, 9:16 PM IST
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामला सुरुवात झाली असून सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर झाले आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सर्वच पक्षातील उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तसंच नाराज नेत्यांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ असून या 21 मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांबरोबरच बंड केलेल्या उमेदवारांनी देखील काल शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला आहे. पुणे जिल्ह्यात तब्बल 1272 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अश्यातच पिंपरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन महाशक्तीमधील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे मावळ्याच्या वेशात घोड्यावर स्वार होत बाळासाहेब ओव्हाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी 100 हून अधिक घोडेस्वार कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. त्यामुळं बाळासाहेब ओव्हाळ सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.