Kidney Stone: किडनी हा मानवी शरीराचा महत्वाचा भाग आहे. रक्त शुद्ध करून शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे शरीरातून बाहेर काढण्याचं काम किडनी करते. परंतु, सदोष जीवनशैली आणि खराब आहारामुळे किडनी स्टोनसह अनेक आजारांचा धोका वाढला आहे. मुतखडा ही एक गंभीर समस्या धारण करत आहे. ज्याचा त्रास असहाय्य आहे. किडनी स्टोनचा त्रास झाल्यास लघवी करताना वेदना होतात. तसंच ओटीपोटाच्या भागात वेदना होतात. लहान किडनी स्टोन लघवीद्वारे बाहेर निघू शकतात. परंतु, मोठा असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. तुम्हाला किडनी स्टोनची समस्या टाळायची असेल, तर काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा.
- हे घटक खा
- तुळस: तुळशीतील घटक युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.
- पाणी: तुम्हाला किडनी स्टोन असेल तर दिवसातून किमान 12 ग्लास पाणी घ्या. यामुळे किडनी स्टोन पाण्याच्या मतदीने शरीरातून लवकर काढून टाकली जातात.
- लिंबाचा रस: लिंबाच्या रसामुळे किडनी स्टोनचा धोका खूप कमी होतो. किडनी स्टोनचा आकार कमी करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे.
- हे घटक खावू नये
- मांसाहारी अन्न: शाकाहारी पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. तुम्हाला किडनी स्टोन असेल तर प्रोटीनचे सेवन कमी करावं. कारण यामुळे किडनी स्टोनचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे अंडी, दही, चणे, मासे, चिकन, आणि डाळी आदी पदार्थांपासून बनलेले पदार्थ खावू नये.
- थंड पेय: किडनी स्टोन असल्यास कोल्ड्रिक, तसंच इतर थंड पदार्थ पिऊ नये. कारण थंड पेय तयार करण्याठी फॉस्फरीक अॅसिडचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे स्टोनचा धोका जास्त वाढतो.
- मीठ: किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी जास्त मिठाचं सेवन करू नये. कारण मीठामध्ये सोडियम असतो आणि सोडियम शरीरात गेल्यानंतर कॅल्शियममध्ये रुपांतरीत होतो. यामुळे शरीरात खडे तयार होतात.
- व्हिटॅमिन सी: किडनी स्टोनचा त्रास असेल तर व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ जास्त प्रमाणात घेऊ नये.
- किडनी स्टोन असलेल्या लोकांनी पालक, जांभूळ, सुकामेवा, बी आणि चहा पिऊ नये. कारण यात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते.
संदर्भ
https://www.kidney.org/kidney-topics/kidney-stone-diet-plan-and-prevention
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)