होळी पौर्णिमेनिमित्त 'दगडूशेठ' गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास; पाहा व्हिडिओ - Holi Festival 2024 - HOLI FESTIVAL 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 24, 2024, 1:39 PM IST
पुणे Holi Festival 2024 : होळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या द्राक्ष महोत्सवात हजारो हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात साजरा झालेला द्राक्ष महोत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित 2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती दर्शवली. ही द्राक्षे भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. द्राक्षाच्या हंगामात सलग तिसऱ्या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात करण्यात आली. हे पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केलीय. सणानिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्ट नेहमीच आगळेवेगळे उपक्रम करत असते.