पुण्याला धो-धो पावसानं झोडपलं; रस्ते बनले स्विमींगपूल, पाहा व्हिडिओ - Pune Rain - PUNE RAIN
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 8, 2024, 8:00 PM IST
पुणे Heavy Rain in Pune : पुणे शहराला एक ते दीड तास जोरदार पावसानं झोडपलं. यामुळं शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं कालपासून राज्यातील अनेक विभागात यलो अलर्ट दिला होता. शहरात एका तासात 100 मिली मिटर इतका पाऊस झाल्याचं सांगितलं जातंय. यामुळं शहरातील अनेक भागात झाडं पडली असून रस्त्यांवर पाणीच पाणी झालेलं चित्र पाहायला मिळतंय. काही रस्त्यांवर गुडघ्याइतकं पाणी साचलं असून यात काही ठिकाणी तरुण चक्क पोहताना दिसत आहेत. राज्यात मान्सून दाखल झाला असून पहिल्याच पावसात पुण्याची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील मुख्य पेठांमध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे तर उपनगरांमध्ये देखील अनेक घरात पाणी शिरल्याचं दिसतंय. शहरात पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय.