काँग्रेसने संविधानाबाबत खोटा प्रचार करून नागरिकांची दिशाभूल केली; हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांची टीका - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 11, 2024, 10:56 PM IST
पुणे : हरियाणामध्ये नागरिकांनी तिसऱ्यादा भाजपा सरकारला बहुमत दिलं, यात गरिबाचा मोठा वाटा होता. महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेस पक्षानं खोटी आश्वासने देऊन मते विभागणी केली आणि नंतर गरिबाचं शोषण केल्याचा त्यांचा पूर्व इतिहास आहे. यामुळं आत्ता महाराष्ट्रातील जनता हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीला साथ देईल असा विश्वास हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी व्यक्त केला. पुण्यात आज मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, प्रवक्ते संदीप खर्डेकर, उपस्थित होते. यावेळी त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं.
महायुतीला साथ द्यावी : यावेळी सैनी म्हणाले की, "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा निवडणूकीमध्ये महिलांना आणि तरुणांना आश्वासने दिली पण त्याची पूर्तता अद्याप केली नाही. तसेच लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसने संविधानाबाबत खोटा प्रचार करून, व्होट बँक राजकारण करत नागरिकांची दिशाभूल केली. त्यामुळं महाराष्ट्रातील नागरिकांनी आता सतर्क राहून महायुतीला साथ द्यावी असं आवाहन सैनी यांनी केलंय.