गोळीबार प्रकरणाचा निषेध; गणपत गायकवाड खोटे बोलत आहेत, गोपाळ लांडगे यांची प्रतिक्रिया - गोपाळ लांडगे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 3, 2024, 2:17 PM IST
ठाणे BJP MLA Ganpat Gaikwad Firing Incident : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेले महेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काय म्हणाले गोपाळ लांडगे : याप्रसंगी गोपाळ लांडगे म्हणाले की, डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे महेश गायकवाड यांच्यावरती सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झाले आहेत. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे. एका लोकप्रतिनिधींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अशाप्रकारे कृत्य केलं हे घृणास्पद आहे. त्यांचा मी निषेध करतो. जो कांगावा केला जातो तो खोटा आहे. तिकडचे लोक सांगत आहे की, अशाप्रकारे काही झालं नाही. सत्य लवकरच बाहेर येणार आहे. या गोष्टीचा निषेध करावा तितकं कमीच आहे. आपण गुन्हा करायचा आणि त्यावर आपण आरोप करायचे, हे काय उपयोगाचे नाही. यांनी गुन्हा केलाय ते उच्च पदसदस्य कोणाचे नाव घेऊन आहेत ते निषेधार्थे आहे. त्यांनी स्वतःचा बचाव करताना दुसऱ्यांवर किती आरोप केले तरी ते खोटे आहेत. ते कधी सिद्ध होऊ शकणार नाही.
गोपाळ लांडगे हे ठाणे ग्रामीणचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत.