घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची ठाणे स्थानकात पुनरावृत्ती होण्याची शक्यता, होर्डिंगवर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी - Thane Hoarding - THANE HOARDING
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 17, 2024, 10:46 PM IST
ठाणे Thane Hoarding News : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची ठाणे स्थानकात पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे स्थानकात असलेल्या एसटीच्या सर्वात जुन्या डेपोमध्ये एक भलामोठं होर्डिंगचा सांगाडा धोकादायक स्थितीमध्ये असून हा सांगाडा वारा आला की जोरात हलतो. त्यामुळं यावर लवकरात-लवकर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. पालघर, वसई, बोईसर, भिवंडी, अर्नाळा या ठिकाणी जाणारे प्रवासी याच डेपोत बस पकडण्यासाठी येतात. शिवाय ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवासीही याच मार्गानं ये-जा करत असतात. या होर्डिंगची साईज ही नियमापेक्षा जास्त मोठी आहे. तसंच हे होर्डिंग खासगी कंपनीचं असून त्याचं टेंडर देखील संपलंय, असं स्थानिकांनी सांगितलं. होर्डिंगसह या डेपोच्या आसपास असणाऱ्या दोन इमारतीही जीर्ण झाल्या आहेत. तसंच या इमारतींना मोठ-मोठ्या भेगा पडल्यानं या इमारती देखील कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. त्यामुळं चिंता व्यक्त केली जात आहे.