ढोल ताशांच्या गजरात पुण्यात मानाचे पाच गणपती बाप्पा झाले विराजमान; पाहा आगमन मिरवणूक व्हिडिओ - Ganeshotsav 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 7, 2024, 9:35 PM IST
पुणे Ganeshotsav 2024 : गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात पुण्यातील मानाचे पाचही गणेशोत्सव मंडळात (Five Maanache Ganpati) बाप्पा विराजमान झाले आहे. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी काडसिध्देश्वर स्वामी यांच्याहस्ते करण्यात आली. मानाचा पहिल्या श्री कसबा गणपतीची आगमन मिरवणुकीची सुरुवात सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी उत्सव मंडपातून करण्यात आली.
श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२ वाजून ११ मिनिटांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. यंदाचे मंडळाचे १३२ वे वर्ष आहे. मानाचा तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी युवा उद्योजक पुनीत बालन व जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते करण्यात आली. यंदाचे मंडळाचे वर्ष १३८ वे वर्ष आहे. गणपतीची आगमन मिरवणूक सकाळी १०.३० वाजता सुरू झाली. मानाचा चौथ्या श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्टची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली. मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणेशोत्सव मिरवणुकीची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता रमणबाग चौकातून करण्यात आली. यंदा ही प्रथेप्रमाणे पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना टिळकांची पाचवी पिढी रौनक टिळक यांच्या हस्ते करण्यात आली.