'दगडूशेठ' गणपती मंदिराला 500 डाळिंबाचा महानैवेद्य, फुलांपासून शेषनागाच्या प्रतिकृतीची आरास; पाहा व्हिडिओ - Dagdusheth Ganpati Temple
🎬 Watch Now: Feature Video
पुणे Dagdusheth Ganpati Temple : डाळिंबाचा महानैवेद्य, फुलांच्या शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक आरास आणि त्यामध्ये गाभाऱ्यात विराजमान गणरायांचं विलोभनीय रुप शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्तानं पाहायला मिळालं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभाऱ्यात गणरायासमोर सुमारे 500 डाळिंबांचा नैवेद्य दाखविण्यात आला. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील अवतार झाला होता. त्यामुळं गाभाऱ्यात या विषयाशी सुसंगत अशी आकर्षक पुष्पसजावटदेखील करण्यात आली. तसंच यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचंदेखील आयोजन करण्यात आलं. सोमवारी (10 जून) पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर सकाळी 4 ते 6 यावेळेत गायक राहुल एकबोटे यांनी स्वराभिषेकातून आपली गायनसेवा अर्पण केली. सकाळी 8 ते दुपारी 12 यावेळेत गणेशयाग होणार आहे. तर दुपारी 1 ते 3 सहस्त्रावर्तनं आणि रात्री 9 ते 11 गणेशजागर पार पडणार आहे.