शेगावच्या 'श्रीं'ची पालखी पंढरपूरकडं रवाना, 700 वारकऱ्यांचा सहभाग - Gajanan Maharaj Palkhi - GAJANAN MAHARAJ PALKHI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 13, 2024, 3:02 PM IST
शेगाव/बुलढाणा Pandharpur Wari : आषाढी वारीसाठी भाविकांना विठुरायाच्या पंढरीची ओढ लागलेली असते. त्यामुळं भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झाले असून आज (13 जून) विदर्भाची पंढरी संतनगरी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या संस्थांच्या पालखीचं विधिवत पूजन करून श्रींच्या सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या उपस्थितीत सकाळी साडेसात वाजता विठुरायाच्या दर्शनासाठी प्रस्थान झाली आहे. विविध अभंगांसह श्रींची पालखी प्रतिमा भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडं मार्गस्थ झाली. यावेळी श्रींचा नामघोष करीत अभंगाच्या तालावर ठेका धरून भाविक तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. पालखीचं हे 55 वं वर्ष असून 17 जुलैला आषाढी एकादशी सोहळा आटपून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी संपूर्ण वारकरी आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होतात. पंढरपूर पालखीत पायदळ वारीकरिता पंढरपूरला जाऊ न शकणारे भाविक आषाढी एकादशीला विदर्भ पंढरी असलेल्या शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांचं दर्शन घेतात.